नवसाक्षरता मूल्यमापन परीक्षा २१ सप्टेंबर रोज

ी सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- केंद्र पुरस्कृत उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) सन 2025-26 मधील परीक्षा जिल्ह्यात रविवार दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत घेणेत येणार असल्याची माहिती प्र. शिक्षणाधिकारी(योजना) निलिमा नाईक यानी दिली आहे. जिल्ह्यात ही परीक्षा मराठी व उर्दू भाषेतून होणार आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यामापन चाचणी (FLNAT) उल्लास संकेस्थळावर असाक्षरांची नोंदणी पाथमिक व माध्यमिक शाळांकडून घेण्यात आलेली आहे अशा सर्व असाक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील उल्लास –नव साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेस नांव नोंदणी करुन प्रविष्ठ होणाऱ्या असाक्षरांनी आपल्या गावातील शाळेत सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व असाक्षरांनी या परीक्षा आनंदाने द्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'