भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 9 (जिमाका) :- जिल्ह्यामधील इ. 11 वी व 12 वी तसचे इयत्ता 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने 20 सप्टेंबर पर्यत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या योजनेचा अटी व शर्ती, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. महाविद्यालयातील इ. 11वी व 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी राहील. तरी गरजु विद्यार्थ्यांनी सन 2024-25 वर्षामध्ये स्वाधारसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी तसेच चालू वर्षात 2025-26 मध्ये प्रवेशित विद्यार्थी स्वाधारसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी तसेच चालू वर्षात 2025-26 मध्ये प्रवेशित विद्यार्थी स्वाधारसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन भरणेत आलेल्या अर्जाची PDf व शैक्षणिक आवश्यक कागदपत्रांसह दि. 20 सप्टेंबर 2025 अखेर नजीकच्या मुलांचे, मुलींचे शासकीय वसतिगृह, महाविद्यालय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे समक्ष, टपालव्दारे परिपुर्ण अर्ज सादर करावेत. संबंधित महाविद्यालयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याबाबत आपल्या स्तरावरुन सूचित करण्यात यावे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (02362 228882) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'