शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲप उपयुक्त
सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजरापेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आवाहानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार AI हे ॲप लाँच केला आहे. कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक ॲप आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या साहाय्याने हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आणि आधुनिक शेती पध्दतीचे मार्गदर्शन करते.
महाविस्तार AI ॲपमधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतो. रिअल – टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवर हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल- टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषि योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळु शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. या मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करुन पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय मिळवु शकतात.
महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे आहेत, त्यामुळे सल्ला त्यांच्या मोबाइलवर मिळतो. ज्यामुळे वेळ वाचतो, चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पान खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
गुगल प्ले स्टोअर जाऊन महाविस्तार AI ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
लिंक व स्कॅनर
hattps://play.google.com/store/apps/detail?id=in.gov.mahapocra.mahavistaarai
०००००
Comments
Post a Comment