भूसंपादन मोबदला वाटपासाठी 29 सप्टेंबर रोजी ऐनारी येथे कॅम्पचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- “शासन आपल्या दारी” या मोहिमेतून भूसंपादन प्रस्ताव क्रमांक २२/२००७ ऐनारी मधील शिल्लक निवाडा रक्कम मोबदलाधारक यांना दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालय ऐनारी ता. वैभववाडी येथे वाटप करण्यासाठी कॅम्पचे आयोजन करणेत आलेले आहे. या कॅम्पमध्ये मोबदला मिळण्याचे शिल्लक खातेदारांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन उपविभागीय जलसंधारण अधिकारी सं. शिरोडकर यांनी केले आहे. शिल्लक खातेदारांच्या नावांची यादी तलाठी भुईबावडा ता. वैभववाडी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच जिल्हयाची Sindhudurg nic.in या वेवसाईटवर देखील उपलब्ध आहे. तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी, भुईबावडा यांचेशी संपर्क साधून त्यांचेकडे दिलेल्या परिशीष्ठ मधील खालीलप्रमाणे कागदपत्रे कॅम्पला येताना घेवून यावेत. मोबदला मिळण्यासाठी सादर करणेचे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे १. १८९४ च्या अधिनियम एक च्या कलम १२ (२) खालील नोटोसीची मुळ प्रत. २. पोलीस पाटील यांच्याकडील दाखला. ३. खातेदार मयत असल्यास मृत्यूचा दाखला, वारस रजिस्टर उतारा (गाव नमुना नंबर ६ क व ६). ४. कोणत्याही न्यायालयात मिळकतीची अनुषंगाने वाद असल्यास तत्संबंधीत नोटीसा व नुकसान भरपाईची रक्कम यापूर्वी घेतली असल्यास- नसल्यास तशी खात्री करुन, तसेच मिळकतीत वाद नसल्यास तसे विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (रुपये १००/- चे बाँड पेपरवर कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर पूर्ण केलेले). (सोबतच्या नमुन्यात मोबदलाधारक मयत असल्यास सर्व वारसांचे एकत्र प्रतिज्ञापत्र) ५. विहीत नमुन्यातील क्षतिपूर्ती बंधपत्र (रुपये १००/- चे बाँड पेपरवर कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर पूर्ण केलेले. ६. विहीत नमुन्यातील स्वघोषणापत्र (साध्या कागदावर) ७. शीधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक Cancelled कोरा चेक विहीत नमुन्यातील फॉर्मवर बँकेकडील शिक्का व स्वाक्षरी तसेच आधारकार्ड सहीत स्वतःचे व साक्षीदार पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे (OTP साठी). ८. बँक पासबुकची बँकेकडून प्रमाणित केलेली फोटो असलेली छायांकित प्रत. ९. वर्ग ०२ बोजा असल्यास त्याप्रमाणे संबंधीतांचे नाहरकत प्रमाणपत्र. १०. नावात/आडनावात बदल असल्यास शासन राजपत्रात केलेल्या बदलाची सर्व मोबदलाधारकांची प्रत. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'