शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी
सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.):- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला- मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशा 3 ठिकाणी तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 5 ठिकाणी आहेत. असे एकूण 8 शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी, विद्यार्थीनींना शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली, असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले दिली आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय सह इतर प्रवर्गाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. https://hmas.mahait.org या पोर्टलवर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज भरण्यात यावे. भरलेला अर्ज डाऊनलोड करुन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे जमा करावेत.
शासकीय वतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय - वाफ आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा 02362 228882 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment