भूमि लोक अदालतीचे 29 सप्टेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यांसाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी यांनी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे कळविले आहे. या लोक अदालत मध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग यांच्यकडील प्रलंबित अपील प्रकरणावर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय यावर भर दिला जाणार आहे. यासाठी अपीलामधील दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड करण्यास मदत करून अपील प्रकरणे कायम स्वरूपी निकाली काढ़णेकामी संबंधित नागरिकांनी किंवा अपीलकर्त्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन उपस्थित रहावे. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांच्याकडून या लोक अदालतीसाठी जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'