शासकीय वसतिगृह व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत

सिंधुदुर्गनगरी दि.23 (जिमाका):- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला- मुलींसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहामध्ये सन 2025-26 शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियासाठी विद्यार्थी, विद्यार्थींनी ऑनलाईन पध्दतीने 30 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला असे एकूण 03 तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 05 व एकूण 08 शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी, विदयार्थीनींना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. तरी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय सह इतर प्रवर्गाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेण्याऱ्या सर्व विदयार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. https://hmas.mahait.org या पोर्टलवर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी गरजू विदयार्थ्यांनी सन २०२५-२६ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या इच्छूक विदयार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर प्रवेश अर्जाची नोंदणी ३० सप्टेंबर २०२५ अखेर करावी व भरलेल अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेवून संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत. शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम, व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी इच्छुक विदयाथ्यर्थ्यांनी तालुक्यास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२-२२८८८२) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीप्रकाव्दारे कळविले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'