विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकारच्या मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) २०२६ चे आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व युवकांनी सहभागी होण्याचे आणि विकसित भारताच्या उभारणीत आपली भूमिका बजावण्याचे आवाहन मेरा युवा भारत, सिंधुदुर्गचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांना नेतृत्व, चर्चा आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेणे आहे. या संवादाचे उद्दीष्ट तरुणांना विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी जोडणे आहे. तरुणांना त्यांचे विचार, ऊर्जा आणि नेतृत्व कौशल्ये दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या संवादाची सुरुवात 'माय भारत क्विझ' ने होत आहे, जी १२ भाषांमध्ये आयोजित केली आहे. या क्विझमध्ये एकूण २० प्रश्न आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी १० मिनिटे दिली आहेत आणि त्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर, २०२५ आहे. पहिल्या १० हजार विजेत्यांना मोफत माय भारत भेटवस्तू मिळतील. निवडलेल्या सहभागींना निबंध लेखन, सादरीकरण आणि संवाद सत्रासारख्या पुढील टप्प्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. शेवटच्या फेरीचा कार्यक्रम नवीदिल्ली येथील भारत मंडपम येथे जानेवारी 10 ते 12 या काळात प्रधानमंत्री नरेद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लिंक https:// mybharat.gov. in/quiz/quiz_dashboard/ UzZIZmhEeWt6bmtzcGg1ZHQ1dWc3QT09 वर उपलब्ध आहे. या संवादामुळे तरुणांना त्यांचे विचार मांडण्याची, नेतृत्व प्रदर्शित करण्याची आणि सामाजिक दृष्टिकोनातून राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची संधी मिळेल.
००००००००
Comments
Post a Comment