"पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजने"साठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.) : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील भटक्या जमाती - क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना "पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना" शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन २०२५-२६ योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्याक्रमध्ये (बिगर व्यावसायिक अभ्यसक्रम वगळून) विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने 29 सप्टेंबर 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे जमा करावयाचे आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'