शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळण्यासाठी पाठपुरावा करा - खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर पाठपुरवा करावा, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज कृषी विभागाला दिले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची सभा आज झाली. या सभेला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उप वनसंरक्षक नवकिशोर रड्डी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते. खासदार श्री. राऊत यांनी विषय निहाय सविस्तर आढावा घेतला ते म्हणाले, पावसाळ्यात रस्त्यांवर विशेषत: घाट मार्गावर अपघात होणार नाहीत यांची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. आंबोली बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करुन द्यावे. पुनवर्सन विभागाने संकलन यादीची छाननी करुन अहवाल तयार करुन द्यावा. शेती उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना पॉवर ट्रीलर मिळण्यासाठी लॅाटरी काढण्याबाबत पत्रव्यवहार करावा. दूरसंचार विभागाने फोर जी सेवा देण्याबाबत प्रयत्न करावा. रेल्वेने प्रवाश्यांसाठी निवारा उभे करावेत. यावेळी गगनबावडा घाट मार्गात जेसीबी उपलब्ध करुन देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'