जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा 24 जुलै, ऐवजी 26 जुलै रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 24 जुलै रोजी करण्यात आले होते. तथापि जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे स्पर्धेच्या दिनांकात बदल करण्यात आलेला आहे. ही स्पर्धा दि. 26 जुलै 2023 रोजी सकाळी 9 वाजता श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगांव ता. कुडाळ येथे आयोजित करण्यात आले असल्याचे वेंगुर्ला तालुकाचे क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी कळविले आहे. सुब्रतो मुखर्जी एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीव्दारा सन 2023-24 या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 62 वी आंतरराष्ट्रीय सुब्रतो फुटबॉल कप (सुबज्युनियर, ज्युनियर) क्रीडा स्पर्धा या खेळाच्या स्पर्धांच्या आयोजन करण्यात येत आलेले आहे. या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा दि. 14 सप्टेंबर ते 23 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत 17 वर्षाखालील मुले, मुली (ज्युनीयर) या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे आयोजित होत आहेत. व 14 वर्षावालील मुले, मुली (सबज्युनियर) या वयोगटाच्या स्पर्धा बंगलुर या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. वयोगट :- 14 वर्षाखालील मुले (सबज्युनियर) जन्मतारीख- दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. वयोगट :- 17 वर्षाखालील मुले व मुली ( ज्युनियर)- जन्मतारीख दि. 1 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच जे संघ सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यापुर्वी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी याची नोंद घ्यावी व आपला फुटबॉलच्या संघास स्पर्धा ठिकणी उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'