केवळ 1 रुपया भरुन पीक योजनेत सहभागी व्हा - विजयकुमार राऊत

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) : शेतकऱ्यांनी सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ रु.1 रुपया भरुन पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी व (CSC) ने अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन PMFBY र्पार्टल https://pmfby.gov.in वर स्वत:शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांच्या मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु.40 देण्यात येते. परंतु राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाडून शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांनकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'