नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) : अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणातील पाणी पातळी 159.50 पर्यंत भरली असून, कुठल्याही क्षणी धरणातील पाण्याचा विसर्ग सांडव्यावरुन अरुणा नदीत चालू होणार आहे. दि. 6 जुलै 2023 रोजी पासून पावसाळी हंगाम संपेपर्यंत नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरु नये. सावधानता बाळगावी, असा सतर्कतेचा इशारा आंबडपाल चे मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे उप कार्यकारी अभियंता अभय मगरे यांनी दिला आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'