सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण पुर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी सन 2022-23 अखेरील लेखापरीक्षण विहीत मुदतीत पूर्ण करुन, लेखापरीक्षण अहवाल निबंधक कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक माणिक भा. सांगळे यांनी केले आहे. सन 2023-24 या वर्षासाठी लेखापरिक्षक नेमणुकीचे ठराव व संबंधित लेखापरिक्षक यांचे सदर बाबतचे संमत्तीपत्र दि. 31 ऑक्टोंबर 2023 पूर्वी संबंधित संस्थेचे निबंधक कार्यालयत पोहोच करावेत. ज्या संस्थांकडून विहीत मुदतीत लेखापरीक्षण नेमणुकीचे ठराव व लेखापरीक्षक यांचे संमत्तीपत्र प्राप्त होणार नाहीत, अशा संस्थांवर कायद्यातील तरतुदीनुसार सन 2023-24 चे लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नियुक्तीचे आदेश निर्गमीत करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. व सहाकारी कायद्यातील तरतुदीचे सर्व सहकारी संस्थांनी काटेकोरपणे पालन करावे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 अन्वये नोंदणीकृत झालेल्या सर्व सहकारी संस्थानी सदर अधिनियमातील कलम 79 (1अ) अन्वये प्रत्येक वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या सहा महिन्यांच्या आत (म्हणजेच 30 सप्टेंबर पूर्वी) सदर कलमात नमुद केलेली लेखापरीक्षण अहवालासह (क) ते (च) ही विवरणपत्रे संबंधित निबंधकाकडे दाखल करणे अनिवार्य आहे. तसेच कलम 75 प्रमाणे विहीत मुदतीत संस्थेची अधिमंडळाची वार्षिक बैठक आयोजित करण्यात यावी व कलम 79 (1 ब) अन्वये संस्थेने आपले वार्षिक बैठकीचे दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत सदर बैठकीत सर्व संम्मतीने, राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामतालीकेमधून लेखपरीक्षणाकरीता लेखापरीक्षक नेमणुकी संबंधि केलेला ठराव व संबंधित लेखापरीक्षक यांचे त्याबाबतचे संमतीपत्र संबंधित निबंधकाकडे दाखल करावयाची आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'