मराठा, कुणबी उमेदवारांनी कौशल्य प्रशिक्षणसाठी लिंकव्दारे नोंदणी करावी

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : जिल्ह्ययातील मराठा, कुणबी, मराठा–कुणबी व कुणबी- मराठा उमेदवारांनी आवश्यक असलेल्या कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम लिंकव्दारे भरुन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. ग.प्र. बिटाडे यांनी केले आहे. सारथीच्या लक्षित गटातील उमेदवारांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर उमेदवारांमार्फत कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता नोंदणी फॉर्म तयार करण्यात आला असून त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://Kaushaly.mahaswayam.gov.in/users/sarthi . या कार्यक्रमांतर्गत सारथीच्या लक्षित गटातील (मराठा,कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी- मराठा) उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण जिल्ह्यातील स्किल इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमाकरिता 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, ट्रेनिंग सेंटर (TP-TC) यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत उद्दीष्ट वाटप करण्यांत येणार आहे. छत्रपती शाहु महाराज संशोधन प्राशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राज्यातील सारथीच्या लक्षित गटातील 20,000 उमेदवारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02362,228835 किंवा ई-मेल sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'