गड नदीकाठच्या ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : गड नदीची इशारा पातळी 36.764 मीटर इतकी असून नदीची धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी 35.00 मीटर इतकी झालेली आहे. गड नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दि.7 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. तरी त्या अनुषंगाने आपणांस कळवण्यात येते की, आपल्याकडून गड नदीच्या पुरप्रवण क्षेत्रात येणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे, मर्डे, बांदिवडे, चिंदर, माळगाव, बागायत आणि कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे, जानवली, फणसनगर या गावातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात. या संदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. गड नदीच्या पुरबाधित क्षेत्रात येणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे, मर्डे बांदिवडे, चिंदर, माळगाव बागायत आणि कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे, जानवली, फणसनगर या गावातील ग्रामस्थांना सदर बाबाची आपल्या यंत्रणेमार्फत माहिती देण्यात यावी. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून ये जा करू नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यक ती सतर्कता बाळगावी. मालवण तालुक्यातील मसुरे, मर्डे, बांदिवडे, चिंदर माळगाव, बागायत आणि कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे, जानवली फणसनगर या ग्रामपंचायतीनेी सखल भागात राहणाऱ्या तसेच कच्चा घरात राहणाऱ्या व्यक्तींबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास आवश्यकतेनुसार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यावे. त्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांनी सुरक्षित निवा-याकरिता शाळांची निवड करण्याच्या सूचना आपल्या अधिनस्थ यंत्रणांना द्याव्यात. नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पुलांवर पाणी आल्यास अशा पुलावरून वाहतूक होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. तसेच अशा पुलाच्या ठिकाणी पोलीस तैनात ठेवावेत. तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांच्या संपर्कात रहावे व त्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे. विशेषत: पूरस्थिती निर्माण होवून त्याकरिता होड्यांची आवश्यकता लागल्यास होड्या त्वरित उपलब्ध होतील या अनुषंगाने आवश्यक ते नियोजन तालुकास्तरावरून करण्यात यावे. पुराच्या पाण्यान झाडे उन्मळून पडल्यास तो बाजूला घेण्यासाठी आवश्यक कटर उपलब्ध करून ठेवावेत. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरित माहिती द्यावी. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'