जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी
सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 10 जुलै 2023 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन) जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
यासभेनंतर 5 वा. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत बैठक, 5.15 वा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत आढावा बैठक, 5.30 वा. जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक तसेच 5.45 वा. जिल्ह्यातील आदिम जमाती कातकरी यांच्या करिता विविध योजना राबविण्याकरिता बैठक होणार आहे.
0000
Comments
Post a Comment