20 जुलै रोजी पोस्टल पेन्शन अदालत

सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का.): अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयामध्ये टपाल विभागातील पेन्शन धारकांसाठी, पोस्टल पेन्शन अदालत गुरुवार दि. 20 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केली आहे. अशी माहिती सिंधुदुर्गनगरी विभागाचे अधीक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी दिली आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत. ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे. ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटारा झालेला नाही अशा प्रकरणाचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी इत्यादी आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारक यांनी आपले अर्ज मयुरेश म.कोले, अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्गनगरी 416812 या पत्त्यावर दिनांक 18 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकता त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'