नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी 14 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करा
सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) : सेवा सोसायट्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे आपले प्रस्ताव दिनांक 14 जुलै 2023 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे.
बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्य उद्देशाने रु. 3 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक: कौविउवि-2015 प्र. क्र.97 रोस्वरो-1 दि.11/12/2015 अन्वये जिल्हा स्तरावकाम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्रे प्राप्त झालेली आहे.
आवश्यक अटी व शर्तीची पुर्तताकरणे अनिवार्य आहे. अशिरा प्राप्त झालेली तसेच अपुर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
०००००
Comments
Post a Comment