स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) अंतर्गत 15 ग्रामपंचायतींची बुधवारी तपासणी - उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर
सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का.) : स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०२३ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे नामांकण राज्य व केंद्र स्तरावर होणार आहे. या अंतर्गत राज्यस्तर तपासणी करीता तपासणी समिती उद्या दिनांक ५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होत असून जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा) २०२३ अंतर्गत ग्रामपंचायतींची तपासणी तीन गटात करण्यात येणार आहे. यामध्ये २००० पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती २००० ते ५००० लोकसंख्या असनाऱ्या ग्रामपंचायती व ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती असा निकष ठेवण्यात आला आहे. तालुकास्तरावरून प्रत्येक गटातील पाच ग्रामपंचायतीची जिल्हास्तराकरीता निवड करण्यात आली होती. जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील तालुकास्तरावरून निवड केलेल्या ग्रामपंचायती पैकी वरील तीन गटात प्रति गट पाच या प्रमाणे १५ ग्रामपंचायतींची राज्यस्तराकरीता निवड केली आहे. या निवडी करीता ऑनलाईन प्रणालीवर एक प्रश्नावली केंद्र शासनाकडुन तयार करण्यात आली होती. याच प्रणालीच्या माध्यमातून तालुका व जिल्हास्तराची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व हागणदारी मुक्त अधिक या विषयावर ऑनलाईन ५०० मार्कची प्रश्नावली ऑनलाईन प्रणालीवर तयार करण्यात आली होती.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत देवगड तालुक्यातील दाभोळे व बापर्डे, कणकवली तालुक्यातील लोरे, कोळोशी, कलमठ, मालवण तालुक्यातील गोळवण, कुडाळ तालुक्यातील कसाल, कुंदे व माणगाव, वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार, उभादांडा, दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, मळेवाड तर वैभववाडी तालुक्यातील सडूरे ग्रामपंचायतींची राज्यस्तर तपासणी करीता निवड करण्यात आली आहे. उद्या दिनांक ५ जुलै २०२३ ते ८ जुलै २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील निवड झालेल्या ग्रामपंचायतींची राज्यस्तराकरीता तपासणी होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे (पाणी व स्वच्छता) विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठाकुर यांनी दिली आहे.
00000
Comments
Post a Comment