कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची सेंक्टर निहाय नोंद करा
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : जिल्हयातील युवक युवती, इंडस्ट्रीज/इंडस्ट्रीज असोसिएशनला आवश्यक असलेल्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची सेक्टर निहाय लिंक वर नोंद करण्यात यावी, जेणेकरून या अभ्यासक्रमाचा समावेश कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
या प्रशिक्षणात जिल्ह्यातील युवक युवतींना उद्योगाच्या मागणीवर आधारित (Demand Driver) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी दि. 1 ते 31 जुलै 2023 दरम्यान कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण मोहिम आणि उद्योगाची कुशल मनुष्यबळ मागणी मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/kYtsxbvhrz२s७z६q८ अशी आहे. याव्दारे जिल्हयातील युवक युवतींना या लिंक वर आवश्यक असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सेक्टर निहाय नोंद लिंक वर करण्यात यावी.
उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी (Mapping of Skill Requirement in Manpower of Industries) मोहीम दि. 1 ते 31 जुलै 2023 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यांत आला असून गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/३ LQGQTayTnk२gZWk९ अशी आहे. जिल्हयातील उद्योजकांना आवश्यक कुशल, अर्धकुशल व अकुशल उमेदवारांना आवश्यक असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाची गरज सेक्टर निहाय नोंदविल्यास त्या अभ्यासक्रमाचा समोवश कौशल्य प्रशिक्षणात करणे शक्य होईल.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) राज्यामध्ये कौशल्य विकास उपक्रमांची अंमलबजावणी व सनियंत्रण करणारी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. MSSDS मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत जिल्हा कौशल्य विकास आराखडयाच्या माध्यमातून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.
00000
Comments
Post a Comment