बचत खात्यामध्ये बदल केला असल्यास कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का.) : जिल्हा कोषागार कार्यालयास न कळविता ज्या निवृत्तीधारकांनी परस्पर बँक शाखा बदललेली आहे. त्यांनी बँक बदलीबाबतचा अर्ज, बदललेल्या बँक खात्यांच्या पासबुकच्या छायांकित प्रतीसह जिल्हा कोषागार कार्यालय दि. 24 जुलै 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी संजय गोविंद घोगळे यांनी केले आहे. संचालक, लेखा व कोषागार, मुंबई यांच्याकडील प्राप्त संदेश नुसार दि. 19 जून 2023 जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग येथे ई- कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. ई-कुबेर प्रणालीव्दारे दरमहा करण्यात येणारे निवृत्तीवेतनाचे प्रदान संबंधित निवृत्तीवेतनधारकाच्या बँक खात्यामध्ये बँक खाते, बँक शाखा व आय. एफ.सी कोड निहाय जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'