तिमाही ई आर 1 विवरणपत्र 31 जुलै पर्यंत ऑनलाईन सादर करावे - प्र.सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे

सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का.) : सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा १९५९ अन्यये कलम ५ मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर -१ प्रत्येक तिमाही संपल्यावर ३० दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर दि. 31 जुलै पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे. ज्या उद्योजक, आस्थापना यांना ऑनलाईन व्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील अशांनी या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२३६२-२२८८३५ वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त श्री. बिटोडे यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'