4 ग्रामपंचायतीची केंद्रस्तरीय नामांकन स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 4 ग्रामपंचायतीची होणार तपासणी

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का.) : स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत बापर्डे, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत परुळेबाजार, कणककवली तालुक्यातील ग्रामपंचायत लोरे, दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत कुंब्रल या 4 ग्रामपंचायतीचे नामांकन केंद्रस्तराकरिता झाले आहे. या ग्रामपंचायतीची केंद्रस्तरीय समितीच्या माध्यमातून दिनांक 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान तपासणी होणार आहे. असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी कळविले आहे. स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीची राज्यस्तराकरीता जिल्हास्तर तपासणी समितीच्या माध्यमातुन निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या 15 ग्रामपंचायतीची दिनांक 5 जुलै ते 8 जुलै 2023 या कालावधीत राज्यस्तर तपासणी समितीच्या माध्यमातून तपासणी पूर्ण करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा.) 2023 अंतर्गत राज्यस्तरावरुन निवड करण्यात आलेल्या राज्यातील 32 ग्रामपंचायतीमध्ये बापर्डे, परुळेबाजार, लोरे, कुंब्रल या 4 ग्रामपंचायतीची निवड केंद्रस्तर स्पर्धेकरीता झाली आहे. या ग्रामपंचायतीचे नामनिर्देश राज्यस्तरावरुन केंद्रस्तरावर पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी स्वच्छता, गावातील स्वच्छतेबाबत जाणीव जागृती याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'