जलयुक्त ची कामे युध्दपातळीवर सुरु करा -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या तालुका निहाय गावांमध्ये युध्दपातळीवर कामे सुरू करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी आज घेतली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रशिक्षणार्थी आय. एस. करिष्मा नायर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आदी उपस्थित होते. सर्व यंत्रणांच्या सहभागाने आणि समन्वयाने कामे सुरू करावीत असे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ग्रामपंचायत सेवाभावी संस्था, सामाजिक संस्थांचाही यात सहभाग घ्यावा. त्यासाठी बैठक आयोजित करावी. ही कामे सर्व यंत्रणांच्या समन्वयाने युध्दपातळीवर सुरु करावीत त्यासाठीचे तांत्रिक अंदाजपत्रकही तयार करावे, असेही त्या म्हणाल्या.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'