माजी सैनिकांनी वृक्षारोपन करावे
सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आप आपल्या ग्रामपंचात कार्यालयाशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्याचे,आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
गावपातळीवर ग्रामपंचायत प्रशासन व माजी सैनिक यांच्या सहभागाने कारगील विजय दिवसाचे औचित्य साधुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिर्मित्त दि. 26 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण करावे. या वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या माजी सैनिकांना या कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे बक्षीसे प्रदान करण्यात येतील.
ज्या गावामध्ये 50 पेक्षा कमी माजी सैनिक असतील त्या गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक समुहाला प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये व व्दितीय क्रमांकास 5 हजार रुपये प्रदान करण्यात येतील. तसेच ज्या गावामध्ये 50 पेक्षा जास्त माजी सैनिक असतील त्या गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक समुहाला प्रथम क्रमांकास 20 हजार रुपये व व्दितीय क्रमांकास 10 हजार रुपये प्रदान करण्यात येतील.
वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी सैनिकांनी संबंधित गावातील वृक्षरोपण कार्यक्रमाचे फोटो व त्याबाबतचा अहवाल संबंधित सरपंचाच्या स्वाक्षरीनिशी या कार्यालयात दिनांक 27 जुलै 2023 रोजी सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय दूरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment