तिलारी, वाघोटन, कर्ली नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे - अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – भारतीय हवामान खात्यामार्फंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने तिलारी, वाघोटन व कर्ली नदी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात यांनी केले आहे. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने आज सकाळी 11.00 वाजता तिलारी नदीची तिलारीवाडी येथील पाणी पातळी धोका पातळी 43.30 मीटर पर्यंत पोहोचली आहे. तिलारी धरणातून सद्य:स्थितीत 1140 घ.मी./सेकंद एवढस विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, धरणाच्या खालील बाजूस तिलारी नदी व पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरण साठ्या होणारी वाढ व विसर्ग पाहता आज धोका पातळी(43.60 मीटरच्या पुढे) ओलांडणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील प्रामुख्याने तिलारीवाडी, कोनाळकट्टा, परमे, देवमळा, धनगरवाडी, वानोसीवाडी, मणेरी, तळेवाडी, दोडामार्ग, घोटगेवाडी, घोटगे, आवाडे, साटेली, भेडशी, खानयाळे, वायंगणतड, बोडदे, भटवाडी, कुडासे, भरपालवाडी, झरेबांबर, आणि सासोली (वाघमळा) गावातील ग्रामस्थ/ शेतकरी यांना सतर्क राहणेविषयी आवाहन करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत पाणी पातळी अ.क्र. नदीचे नांव धोका पातळी मी. इशारा पातळी मी आजची पातळी मी. (ज्या ठिकाणी पातळी मोजली त्या ठिकाणाचे नांव 1 तिलारी 43.600 41.600 43.30 तिलारीवाडी 2 कर्ली 10.910 9.910 10.50 कुडाळ/ पावशी (भंकसाळ नदी पुल) 3 वाघोटन 10.500 8.500 8.50 खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची इशारा पातळी खारेपाटण पुलाजवळ 8.50 मी. असून सद्याची नदीची पातळी ही 8.50 मी. आहे. तसेच कर्ली खोऱ्यामध्ये नदीची पातळी भंगसाळ पुलाजवळ घेतली जाते सद्य:स्थितीत भंगसाळ पुलाजवळ नदीची पातळी 10.50 मी. असून धोका पातळी 10.91 मी. आहे. सदरचा येणारा विसर्ग अनियंत्रित व विस्तृत पाणलोट क्षेत्रातून येत आहे. त्यामुळे नदीपात्रात नजीकच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'