कणकवली, देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली आणि देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2317.888 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 40(2185), सावंतवाडी - 60(2440.10), वेंगुर्ला - 46(2002), कुडाळ - 50(2909), मालवण - 44(2752), कणकवली - 87(2461), देवगड - 87(2171), वैभववाडी - 42(2323), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment