कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 26.00 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2602.138 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 15.00(2515.00), सावंतवाडी - 32.00(2782.10), वेंगुर्ला - 6.00(2160.00), कुडाळ - 50.00(2462.00), मालवण - 30.00(2849.00), कणकवली - 47.00(2852.00), देवगड - 18.00(2357.00), वैभववाडी - 10.00(2840.00), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment