वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2375.138 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 56.00(2241.00), सावंतवाडी - 50.00(2490.10), वेंगुर्ला - 35.00(2037.00), कुडाळ - 27.00(2236.00), मालवण - 11.00(2763.00), कणकवली - 82.00(2543.00), देवगड - 40.00(2211.00), वैभववाडी - 157.00(2480.00), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment