जिल्ह्यात पावसाचे शतक कणकवली तालुक्यात सर्वाधिक 210 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 147.30 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात 210 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1471.21 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 138(1524), सावंतवाडी - 105(1643.10), वेंगुर्ला - 95.40(1152.60), कुडाळ - 135(1324), मालवण - 152(1624), कणकवली - 210(1602), देवगड - 140(1360), वैभववाडी - 203(1540), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment