वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2664.013 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 25(2568), सावंतवाडी - 21(2852.1), वेंगुर्ला - 07(2190), कुडाळ - 26(2519), मालवण - 20(2893), कणकवली - 31(2910), देवगड - 10(2378), वैभववाडी - 98(3002), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment