जिल्ह्यात पावसाचे शतक कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 119(2145), सावंतवाडी - 130(2380.10), वेंगुर्ला - 145(1956), कुडाळ - 144(2159), मालवण - 190(2708), कणकवली - 240(2374), देवगड - 200(2084), वैभववाडी - 170(2281), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment