तिलारी नदीकाठच्या गावांनी पुढील 5 दिवस सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे - उप कार्यकारी अभियंता सु.दु.आंबी

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – तिलारी नदीपात्रातील पाण्याची पातळी सद्यस्थितीत 43.60 मीटर ( धोका पातळी) इतकी आहे. पुढील चोवीस तासात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. संभाव्य अतिवृष्टीमुळे सांडव्यावरून होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊन नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तिलारी नदीकाठच्या गावातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी यांनी पुढील 5 दिवस सतर्क राहून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे प्रकल्प, बांधकाम विभाग चराठे - सावंतवाडीचे उप कार्यकारी अभियंता सु.दु. आंबी यांनी केले आहे. तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पांतर्गत तिलारी नदीवर मुख्य धरण हे कोनाळ गावाजवळ आहे. तिलारी नदी धरणापासून 21 कि.मी. लांबीचा प्रवास करून गोवा राज्यात प्रवेश करते. आज 23 जुलै रोजी धरण तलांक 111.70 मीटर (94.80 टक्के ) भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे येणारा विसर्ग थेट नदी प्रवाहात वर्ग होत आहे. सद्यःस्थितीत सांडव्यावरून 1123 घ.मी. / सेकंद या प्रमाणे विसर्ग सुरू असून संकल्पीत पूर विसर्ग 3233 घ.मी./सेकंद इतका आहे. 00000 --

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'