तिलारी धरणातून 40 हजार क्युसेक्स विसर्ग

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 40 हजार 83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्यातून 229.515 क्युसेक्स, विद्युत गृहातून 211.86 क्युसेक्स आणि सांडव्यातून 39 हजार 641.83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 424.1050 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.80 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात तब्बल 478.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात 68.1990 द.ल.घ.मी. पाणी साठा असून हा प्रकल्प 69.58 टक्के भरला आहे. सध्या या प्रकल्पातून 158.688 घ.मी. सेकंद विसर्ग सुरू आहे. अरुणा प्रकल्पात 72.9977 द.ल.घ.मी पाणीसाठा असून या धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात 257.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोर्ले- सातंडी प्रकल्प 100 टक्के भरला असून 25.4740 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. या धरणातून 245.102 घ.मी. सेकंद विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधाके प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 4.0971, ओटाव – 2.8468, देंदोनवाडी – 1.3208, तरंदळे – 2.9660, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3130, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.0260, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4160, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.8220, शिरगाव – 1.3590, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'