जिल्ह्यात 2 लाख 66 हजार 731 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 66 हजार 731 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 806 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 291 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 897 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 685 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 90 हजार 932 व्यक्तींनी पहिला डोस तर 34 हजार 214 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 91 हजार 66 नागरिकांनी पहिला डोस तर 21 हजार 146 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 65 हजार 30 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 827 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 41 हजार 894 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 34 हजार 700 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 46 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 88 हजार 220 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 59 हजार 267 कोविशिल्ड आणि 82 हजार 627 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 41 हजार 894 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 170 लसी उपलब्ध असून त्यापैकी 10 कोविशिल्डच्या आणि 160 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 13 हजार 540 लसी शिल्लक असून त्यापैकी 7 हजार कोविशिल्ड आणि 6 हजार 540 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'