अपंग बालकांना शासकीय संस्थेत मोफत प्रवेश

सिंधुदुर्गनगरी दि.19 (जि.मा.का): अपंग बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह, गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव सुविधा पुरवणाऱ्या शासकीय निवासी संस्था, सांगली जिल्ह्यातील मिरज येथील किल्ला भाग मिरज येथे ही संस्था कार्यरक आहे. प्रवेशासाठी पात्रताता पुढीलप्रमणे आाहेत. वय 6 ते 14 वर्षे अस्थिव्यंग प्रवर्ग, जिल्हा शल्य चिकित्सकांचा किमान 40 टक्के अपंगत्वाच दाखला आवश्यक. या संस्थेत शिक्षणसह वसतीगृह, भौतिकोपचार शस्त्रक्रिया व भोजन व्यावस्था इ. सुविधा पुरविल्या जातात. या संस्थेतील प्रवेशासाठी अधिक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारी, मिरज या पत्त्यावर तसेच 0233,2222513, 9921212919, 9860642680, 9325555981, 9422216459, या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन अधिक्षक, शासकीय अपंग बालकगृह व शाळा यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'