जिल्ह्यात संततधार कायम मालवण तालुक्याला पावसाने झोडपले
सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) – जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी 143.25 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 303 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 2006.288 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 89(1984), सावंतवाडी - 120(2196.10), वेंगुर्ला - 140(1717.20), कुडाळ - 169(1925), मालवण - 303(2421), कणकवली - 113(2043), देवगड - 104(1791), वैभववाडी - 108(1973), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment