हातमाग व वस्त्रोद्योग पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का.) - हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) 13 व वेंकटगिरी -2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर , सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 20 आगॅस्ट 2021 पर्यंत मागविण्यात येत आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 20 आगॅस्ट 2021 पर्यत संबंधीत प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांचेकडे सादर करावा. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे वस्त्रोद्योग आयुक्त महाराष्ट्र राज्य शीतल तेली - उगले हे कळवितात.
0000
Comments
Post a Comment