दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2696.56 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 13(2619), सावंतवाडी - 11(2894.10), वेंगुर्ला - 01 (2219.4), कुडाळ - 09(2552), मालवण - 08(2918), कणकवली - 11(2945), देवगड - 03(2386), वैभववाडी - 11(3039), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment