वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 86 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 43.05 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक वैभववाडी तालुक्यात 86 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2093.538 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 14(2026), सावंतवाडी -29(2250.10), वेंगुर्ला – 42.40(1810.20), कुडाळ - 50(2015), मालवण - 48(2518), कणकवली - 33(2134), देवगड – 42 (1884), वैभववाडी -86 (2111), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment