वाघोटन नदी इशारा पातळीजवळ किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) – खारेपाटण पुलाजवळ आज सायंकाळी 5 वा. मोजलेल्या पाणीपातळीनुसार वाघोटन नदीची पातळी 8.250 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 8.500 मीटर असून धोका पातळी 10.500 मीटर आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वाघोटन नदीच्या किनाऱ्यावरील गावांनी सतर्क रहावे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.500 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 7 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'