इयत्ता 12 वी परीक्षार्थींच्या माहितीमधील दुरुस्त्या करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.20(जि.मा.का): उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा सन 2021 या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयामार्फत 3 एप्रिल 2021 रोजी ऑनलाईन प्रवेशपत्र देण्यात आलेली आहेत. प्रवेशपत्रामध्ये विषय माध्यम, फोटो, विद्यार्थ्याची स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, व इतर तत्सम दुरुस्त्या असल्यास याबाबत संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित पध्दतीप्रमाणे संबंधित विभागीय मंडळाकडे दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करणेबाबत संबंधित विद्यार्थी, पालक,शिक्षक,मुख्याध्यापक व सर्व माध्यमिक मंडळातील,निर्धारित गणकयंत्र विभागामार्फत राज्य मंडळाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार राज्य मंडळाच्या गणकयंत्र विभागाकडे पाठवाव्यात. दुरुस्त्या करणेबाबत सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्याथ्यी, शिक्षक,पालक व इतर संबंधित घटक इत्यादीनी नोंद घ्यावी. असे आवाहन डॉ. अशोक भोसले सचिव राज्य मंडळ पुणे यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'