शासकीय तंत्रनिकेतन मालवण मार्फत डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेश व करियर संधीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – शासकीय तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक मालवण हि अत्यल्प खार्चात गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षण देणारी शासकीय संस्था असून या संस्थेमधुन दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थी एम.पी.एस.सी निवड केलेल्या प्राध्यापकांच्या मार्फत पदविका अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, संस्थेमार्फत नोकरीच्या संधी प्राप्त् करुन बाहेर पडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतर अत्यल्प खार्चात तंत्रशिक्षण व नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने हि संस्था सतत झटत असेते. कोरोनामुळे उध्दवलेल्या आपत्ती परिस्थितीत विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनीअरिंग अभ्यासक्रम व करियर संधी याबाबत माहिती देण्याकरिता तसेच विद्यार्थ्यी व पालकांचे शंकानिरसन करण्याकरिता या संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शनाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक खर्च, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे यांविषयी माहिती प्राप्त करुन घेण्याकरिता संस्थेतील प्राध्यापक डॉ.योगेश महाडिक 9423682846, दत्तप्रसाद गोलतकर 9764513133, संदेश जोशी 9422641384 यांचेशी संपर्क साधावा,तसेच या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन प्राचार्च डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे.
Comments
Post a Comment