जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सर्वच तालुक्यात पावसाचे शतक

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) – जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे शतक झाले असून गेल्या चोवीस तासात सरासरी 156.72 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 198 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1853.03 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 140(1895), सावंतवाडी - 190(2076.10), वेंगुर्ला - 159.80(1577.20), कुडाळ - 164(1756), मालवण - 198(2118), कणकवली - 146(1930), देवगड - 144(1687), वैभववाडी - 112(1865), असा पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आजपर्यंत सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 2 हजार 118 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 1 हजार 577 पूर्णांक 20 मि.मी. झाला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'