अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई –पॉस प्रणालीव्दारे
सिंधुदुर्गनगरी दि. 1 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांनी अनुदानित रासायनिक खतांची विक्री ही ई-पॉस (e-PoS) प्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे. तरी ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन L1 सिक्युरिटी ई –पॉस (e-PoS) मशीन प्राप्त केले नाहीत, त्यांनी कृषी विकास अधिकारी, कृषी विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून 10 ऑगस्ट 2025 पूर्वी ई-पॉस मशीन प्राप्त करुन कार्यान्वित करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
खत विक्रीच्या नोंदी या तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
ई-पॉस (e-PoS) स्टॉक व प्रत्यक्ष साठा समान असणे
विक्रेत्यांच्या e-PoS प्रणालीवरील खत साठा व प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठामध्ये कोणतीही तफावत असू नये, यासाठी रासायनिक खतांच्या विक्रीची नोंद IFMS प्रणालीमध्ये त्याक्षणी (Real Time) घेणे बंधनकारक आहे. नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. ज्या विक्रेत्यांकडे PoS वरील खत साठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये फरक आढळेल, अशा विक्रेत्यांचे परवान्यांवर नियामोचीत कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
०००००
Comments
Post a Comment