पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 29 (जिमाका):- शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे, आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन 2025-26 योजनेकरीता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि. 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. अर्जाची एक प्रत सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी यांच्याकडे जमा करावयाचे आहे. या योजनेअंतर्गत सन 2025-26 साठी विद्यार्थ्यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांनी केले आहे, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'