शासकीय वसतीगृहमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 29 (जिमाका):- राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावयासकि व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, बांधकरवाडी कणकवली येथे सुरु झालेले आहे. तरी या वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. या वसतीगृहात सन 2025-26 साठी अभ्यासक्रमनिहाय व जात प्रवर्गनिहाय रिक्त जागा पुढीलप्रमाणे अ.क्र प्रवर्ग एकूण आरक्षण व्यवसायिक अभ्यासक्रम बिगर व्यवसायिक अभ्यासक्र व्यवसायिक अभ्यासक्रम रिक्त जागा 1 इतर मागास वर्ग 51 टक्के 22 9 22 2 विमुक्त जाती, व भटक्या जमाती 33 टक्के 14 6 14 3 विशेष मागास प्रवर्ग 6 टक्के 3 1 3 4 दिव्यांग 4 टक्के 2 - 2 5 अनाथ 2 टक्के 1 - 1 6 आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) 4 टक्के 1 1 1 एकूण 100 43 17 43 सन 2025-26 करीता अटी व निकष पूर्ण करणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या (बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि. 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जावून अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे जमा करावयाची आहे. वसतीगृह प्रवेशाकरीता नियम व अटी- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे (तहसिलदार यांचेकडील उत्पन्न दाखला). योजनेसाठी लाभ घेणेकरीता विद्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे. उच्च शिक्षणासाठी (व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये गुणवत्तेनुसार तसेच, संबंधित प्रवर्गनिहाय विहित आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. याकरीता इयत्ता 12 वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'