ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाज वगळून) उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तरी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थीनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
"ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" सन 2025-26 योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील बीए/बीकॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए/एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्याक्रमध्ये शिक्षण घेणाऱ्या (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विदयार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि. 17 ऑगस्ट 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग. यांच्याकडे जमा करावयाचे आहे.
००००००
Comments
Post a Comment