विषारी सर्पदंश झालेला दोन्ही रुग्णांना जीवनदान

सिंधुदुर्गनगरी दिनांक 4 (जिमाका) :- कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील 38 वर्षीय महिलेला मण्यार या विषारी सापाने दंश केल्याचे निष्पन्न झाले होतो तर मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील 22 वर्षीय पुरुषाच्या पायाच्या अंगठ्याला घोणस या विषारी सापाने दंश केल्याचे निष्पन्न झाले होते. मेडिसिन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रोहित हेरेकर यांचे मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी रुग्णांवर शर्थीचे प्रयत्न करुन उपचार केले. मेडिसिन विभागातील डॉक्टर्स व नर्सेस यांना दोन्ही रुग्णांचे जीव वाचविण्यात यश मिळाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे संर्पदंशावरील उपचाराकरिता आवश्यक सर्व इंजेक्शन्स उपलब्ध असून दोन्ही रुग्णांना नुकतीच रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली, असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'